२५ लाखांच्या खंडणीप्रकरणी महिलेसह तिघांविरोधात गुन्हा

सांगली

उषःकाल हॉस्पिटलच्या विरोधात पोलीस ठाण्यात देण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी शुक्रवारी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन वर्षांपूर्वी इनामधामणी रस्त्यावर असलेल्या उषःकाल हॉस्पिटलविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी २५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानुसार संशयीत आरोपी राहुल शहा, संपदा शहा व यश शहा या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!