बालविवाहप्रकरणी भादोलेच्या तरुणासह नातेवाईकांवर गुन्हा

भादोले ता. हातकणंगले येथे बालविवाह कायद्याविरोधात जाऊन अज्ञान बालिकेशी विवाह केल्याप्रकरणी नीलेश बापूसो अवघडे याच्यासह त्याचे नातेवाईक व विवाहास उपस्थित असणाऱ्या ५० ते ६० वऱ्हाडी मंडळींविरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
भादोले येथील नीलेश बापूसो अवघडे याचा उस्मानाबाद जिल्ह्यातील पंधरा वर्षीय बालिकेशी फेब्रुवारी महिन्यात विवाह लावण्यात आला होता. ही माहिती ग्रामसेवक लक्ष्मण जाधव याना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने वडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत नीलेश बापूसो अवघडे, बापूसो कृष्णा अवघडे, माया बापूसो अवघडे, जगन्नाथ तुकाराम अवघडे (सर्व रा. भादोले), विष्णू कडप्पा जाधव, छाया विष्णु जाधव, सिद्धेश्वर कडप्पा जाधव (सर्व रा. सिद्धेश्वर वडगाव, ता. जि. उस्मानाबाद) यांच्यासह लग्नासाठी उपस्थित असणाऱ्या ५० ते ६० नातेवाईक व मित्रमंडळींविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गजानन घोडके करत आहेत.

error: Content is protected !!