विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

पेद्रेवाडी ता. आजरा येथील महिलेच्या घरात जाऊन त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी निलेश राजाराम हाटवळ व दिलीप राजाराम हाटवळ (दोघे रा. पेद्रेवाडी) यांच्या विरोधात आजरा पोलीसात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पिडीत महिलेने आजरा पोलिसात दिली आहे. याबाबत आजरा पोलीसातून मिळालेली माहिती अशी, पेद्रेवाडी येथे १८ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. यातील निलेश याने पिडीत महिलेच्या घरी जाऊन तुझे अफेअर कोणासोबत सुरू आहे याची चर्चा मुंबईत सुरू असल्याचे सांगून संबंधित महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तर याबाबत जाब विचारण्यासाठी संबंधित महिला व तिचा पती हाटवळ यांच्या घरी गेले असता तू काय लायकीची आहे ते माहिती आहे, तू तुझ्या घरी जा असे म्हणत बदनामी केली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून निलेश व दिलीप या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पो. हे. कॉ. आनंदा नाईक करीत आहेत.

error: Content is protected !!