आंबा गावात चार कुटुंबांना वाळीत टाकल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

शाहूवाडी

आंबा (ता. शाहूवाडी) येथील गाव भागातील प्रस्थापित पाटील व मानकऱ्यांनी गावातीलच चार कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी आठ जणांविरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबत ग्रामपंचायत सदस्य विजय राजाराम पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे ऑनलाईन तक्रार दिली होती.
याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून पांडुरंग बाळू पाटील, प्रकाश शांताराम अस्वले, गणपती अर्जुन पाटील, दत्तात्रय कोंडिबा पाटील, अजय बंडू पाटील, बाबाजी केशव पाटील, शंकर शिवा पाटील, दत्तात्रय भीवा भोसले (सर्व रा. आंबा ता. शाहूवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. संबंधितांना पोलीस निरिक्षक विजय घेरडे यांनी बोलावून यापुढे असे कृत्ये करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र घेतले आहे. दरम्यान, गावातील प्रस्थापित पाटील व मानकऱ्यांनी गावातील पाटील, गवरे, नेर्लेकर, गुरव या कुटुंबांना वाळीत टाकल्याचे तक्रारीत पाटील यांनी म्हटले आहे. यामध्ये सार्वजनिक कार्यक्रम, लग्न, मयतास जाण्यास या कुटुंबीयांबरोबर कोणीही बोलायचे नाही. त्यांना रोजगार द्यायचा नाही, असे ही म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक विजय घेरडे करित आहेत..

error: Content is protected !!