विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

गडहिंग्लज : सासऱ्याच्या नावावर असलेले घर नवीन बांधण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेस मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोनाली आकाश कांबळे (वय २८, निढोरी, सध्या रा. माळ मारुती, गिजवणे) हिने सासरच्या पाच जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये पती आकाश तुकाराम कांबळे, सासरा तुकाराम कांबळे, सासू शारदा कांबळे यांच्यासह नवसाबाई कांबळे, पुष्पा कांबळे (सर्व रा. निढोरी, ता. कागल) यांच्यावर फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास हवालदार दिलीप पाटील करत आहेत.

error: Content is protected !!