महिलेवर बलात्कार करणाऱ्या एकास अटक

इचलकरंजी

महिलेला लग्नाचे आमिष दाखवून महिलेला विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात वृध्दावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. संजय धुळोबा चौगुले (वय ६०, रा. स्टेशन रोड, जुन्या बस स्टॅण्डसमोर इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याला शहापूर पोलिसांनी अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.
संजय चौगुले यांनी एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२४ पर्यंत पीडित महिलेस लग्नाचे अमिष दाखवुन तिचेशी जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवले. यानंतर लग्न करणेस नकार देवुन तिला वाईट शिवीगाळ करुन मारणेची धमकी दिली, असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे या अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!