यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाची एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत हिंदी विषयाची एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. “हिंदी भाषा, कौशल्य, रोजगार” आणि हिंदी गझल, शेरो-शायरी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया”, या विषयावर संपन्न झालेल्या या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून अनुक्रमे डॉ.रमेश खबाले (मलकापूर) आणि डाॅ.आरिफ महात (कोल्हापूर) हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.ए. एम शेख यांनी भूषविले. कार्यशाळेचे संयोजन हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. समन्वयक डॉ. राजकुमार पांडव, प्रा. मोहन सनगर, डॉ. डी. आर. धेडे, डॉ. आर. बी. बसनाईक यांनी संयोजन सहाय्य केले.

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेतील उपस्थितांना प्रमाणपत्र वितरण करताना प्राचार्य डॉ. ए.एम.शेख, संयोजक प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, समन्वयक डॉ राजकुमार पांडव. प्रमुख वक्ते डॉ. आरिफ महात, डॉ. रमेश खबाले, प्रा. मोहन सणगर व सहभागी विद्यार्थी.


प्रा. डॉ .रमेश खबाले यावेळी बोलताना म्हणाले की,” हिंदी भाषेच्या माध्यमातून श्रवण, भाषण, वाचन, लेखन कौशल्य विकसित केल्याशिवाय उत्तम वक्ता, निवेदक, सूत्रसंचालक किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात रोजगार – नोकरी प्राप्त करणे शक्य नाही. आजच्या बदलत्या काळात प्रत्येकाने एक तरी कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत परंतु त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजातील विविध व्यक्ती, घटना प्रसंग, मानवी जीवनाचे अवलोकन आणि निरीक्षणातून तरुणांनी स्वतःचे आयुष्य समृद्ध तर करावेच आणि त्याचबरोबर विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठीही उपयोगी करून घ्या असा आग्रह ही त्यांनी उपस्थितांना केला.
डॉ. आरिफ महात यांनी “हिंदी गझल शेरो-शायरी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया”च्या माध्यमातून रोजगार मिळवणे शक्य असल्याचे सांगून ‘इश्क’ और ‘जुनून’, माणसांमध्ये सतत जागा झाल्याशिवाय ध्येय गाठणे शक्य नाही. एखादा प्रेमी, लैला- मजनू सारखा क्षणोक्षणी त्याच घटना- प्रसंगांचा ध्यास घेतो तेंव्हाच त्याचे लक्ष त्याला प्राप्त होत असते. त्या पद्धतीचे अपार कष्ट, मेहनत, कल्पकता, नाविन्य या गोष्टी हिंदी भाषेच्या माध्यमातून शिकल्यास इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही नाव कमावणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

संयोजक डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी- प्राध्यापक यांनी एकत्रित येऊन सकारात्मक दृष्टीने काही नवीन करणे गरजेचे आहे. हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत त्याच्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कौशल्य आत्मसात करा असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉ. ए.एम शेख म्हणाले की,”देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात हिंदी भाषेच्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी होण्याची संधी या पिढीला उपलब्ध होत आहे त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. नोकरी बरोबर सामाजिक ऐक्य आणि वातावरण भाषा आणि साहित्य समन्वयातून साधने शक्य असल्याचे ते म्हणाले.
कार्यशाळेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील वृक्षाला पाणी देऊन शुभारंभ करण्यात आला.
स्वागत – प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. गिरीजा कोकरे- देसाई यांनी यांनी करून दिला तर सूत्रसंचालन प्रा.मोहन सणगर यांनी केले. समन्वयक डॉ. राजकुमार पांडव यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील करवीर, गगनबावडा, पन्हाळा, शाहुवाडी, राधानगरी आणि संयोजक यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!