हसत खेळत शिक्षण असले तर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागते. याच विचाराने बाळासाहेब पाटील (दादा) हायस्कूल प्रशालेच्या इंग्रजीच्या अध्यापिका सौ. टारे.एस.एम.यांनी The Story of Tea हा पाठ विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी विविध प्रकारचे चहा विद्यार्थ्यांकडून बनवून घेतले.

लेमन टी, वेलची चहा, गवती चहा, ग्रीन टी, मसाला चहा,अमृततुल्य चहा अशा वेगवेगळ्या प्रकारचा चहा विद्यार्थ्यांकडून बनवून घेतले. पावसाळ्यात थंडगार वातावरणात सर्वांना चहा प्रकारांचा मनमुराद आस्वाद घेतला. .या वेळी प्रशालेचे विद्यार्थी,शिक्षक वृंद,सर्व पदाधिकारी,संचालक मंडळ,आणि पालक यांनी उपस्थित राहून या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा चहा पीत आनंद घेतला व कौतुक केले.
