मृत प्रॉडक्शन मॅनेजरचा तसेच पत्नी व मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ; चौदा रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत

हातकणंगले /ता: २२

        हातकणंगले तालुक्यातील नामांकित सूतगिरणीच्या प्रॉडक्शन मॅनेजर यांचा तारीख 20 रोजी पहाटे तीन वाजता अचानक मृत्यू झाला होता . अखेर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . त्यांच्या पत्नीचा , मुलाचा व एका सुपरवायझरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार झाली . असून त्यामधील एक मयत झाले आहे . या घटनेने सूतगिरणी परिसरात खळबळ उडाली आहे .
            सूतगिरणीच्या कार्यकारी संचालकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांची पत्नी व मुलासह एकूण पंधरा जणांचे स्वॅप तपासणीसाठी दिलेले आहेत . सर्वांना क्वारंटाईन केले आहे . या सर्वांच्या रिपोर्टची सध्या प्रतीक्षा लागून राहिली आहे . तारीख 20 च्या पहाटे तीन पासून सूतगिरणी पूर्णपणे बंद ठेवून परिसर लॉकडाऊन केला आहे . तर संपूर्ण सूतगिरणी मध्ये सॅनिटायझरिंग फवारणी व निर्जंतुकीकरण केलेले आहे .

error: Content is protected !!