प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आगरी सेना प्रयत्नशील

वसई / ताः ५-सूर्यकांत देशपांडे

       मुंबई-बडोदा एक्स्प्रेस हायवे, रेल्वे कॅारिडॅार, बुलेट ट्रेन ह्या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि न्याय मिळवून देण्यासाठी आगरी सेना प्रयत्नशील असुन सेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास हरी पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दि.०४, रोजी वसई प्रातांधिकारांच्या बरोबर झालेल्या संयुक्त बैठकीत प्रकल्प ग्र्स्तांच्या मागण्यांविषयी चर्चा झाली. 

      त्याचबरोबर बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी, प्रांत कार्यालया बाहेर होत असलेल्या दलालीतील व्यवहाराबाबत गंभीरपणे लक्ष घालून, संबधितावर कारवाई करण्याची तसेच बाधित शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला लवकरात लवकर व सुलभपणे देण्यात यावा . अशी मागणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा . याबाबत सविस्तरपणे चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे .

error: Content is protected !!