नवे पारगाव /ता :हेमंत सोने
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सिंहाचा वाटा असणा-या आण्णा भाऊ साठेनी दलित,शोषित,उपेक्षित व बहुजनांच्या व्यथा आपल्या विज्ञानवादी साहित्याचा डोंगर रचुन समाजासमोर मांडल्या . अशा थोर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शासनाकडुन यंदा २०२० वर्षाअखेर मरणोत्तर भारतरत्न किताबानी सन्मानित करावे .अशी प्रमुख मागणी डेमाॅक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे यानी केली.

तळसंदे (ता.हातकणंगले) येथे डेमाॅक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया,भटका मुक्ती आंदोलन,राष्ट्रीय दलित महासंघ व न्यु जय मल्हार तरूण मंडळ तळसंदेच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंतीनिमित्त मानवंदना , डीपीआय पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या दिग्गज मान्यवराना नियुक्तीपञांचे वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा प्रबोधनपर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे बोलत होते.
प्रा.सुकुमार कांबळे पुढे म्हणाले, साहित्यरत्न आण्णा भाऊंच्या यंदाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १ ऑगस्ट या आण्णा भाऊंच्या जयंतीपर्यंतच साहित्यरत्न आण्णा भाऊ याना मरणोत्तर भारतरत्नची केंद्र व राज्य सरकारकडुन घोषणा व्हायला हवी होती,तथापि आमची मागणी नाकारलेल्या व आण्णा भाऊंच्याकडे पाहणा-या उदासिनतेचा प्रा.कांबळे यानी यावेळी जाहीर निषेध करून त्यांच्या आजोळी तळसंदे गावातुन मरणोत्तर भारतरत्न व तळसंदे गावात त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे . यंदा २०२० वर्षाअखेर जर केंद्र व राज्य सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने न पाहिल्यास परिवर्तनाचा हा रथ तळसंदेतुन वाटेगाव, चिरागनगर- मुंबई व नंतर दिल्लीतील संसदभवनास घेराव घालुन आण्णा भाऊंच्या बहुजन समाजाप्रती विज्ञानवादी साहित्याचा विचार करणेस भाग पाडणार असलेचा, इशाराही यावेळी प्रा.कांबळे यानी केंद्र व राज्य शासनास दिला.यावेळी प्रा.सुकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय दलित महासंघाचे संस्थापक व मलकापुरचे माजी नगराध्यक्ष रमेश चांदणे,भटका समाज मुक्ती आंदोलनचे संस्थापक भिमराव साठे यांच्यासह दिग्गज मान्यवर कार्यकर्त्यानी आपापल्या संघटना व पक्षाचे डीपीआय पक्षात विलिनीकरण करत डीपीआय पक्षात जाहीर प्रवेश केला . यावेळी त्याना राज्य,जिल्हा व तालुकावार नियुक्ती पञे वितरण व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले. भ.स.मु.आंदोलनचे अध्यक्ष भिमराव साठे,रा.द.महासंघाचे अध्यक्ष रमेश चांदणे, डीपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव आवळे,प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे,प्रदेश सरचिटणीस संदीप ठोंबरे,सांगली जिल्हा महिला आघाडी प्रमुख शितल खरात आदीनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी तळसंदेचे सरपंच अमरसिंह पाटील,माजी उपसरपंच संतोष सुवासे,बंडखोर सेना महीला राज्याध्यक्षा शिवाली आवळे,डीपीआयचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राजु सुवासे,सुरेश महापुरे,रोहित सुवासे,विश्वास सुवासे,रघुनाथ सुवासे, शहाजी सुवासे,राकेश सुवासे,भारत सुवासे,दिलीप सोने,महेश सोने,राजेंद्र डोंगरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.स्वागत राजु सुवासे,प्रास्ताविक रमेश डोंगरे,सुञसंचलन शंकर कांबळे यानी केले तर आभार किसन चांदणे यानी मानले.कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करत हा कार्यक्रम संपन्न झाला.
