हातकणंगले / प्रतिनिधी :-
डॉ.सुजित मिणचेकर फौंडेशन हातकणंगले यांचे माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक तसेच विविध प्रेरणादायी उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे शिक्षक व शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येते. यावेळी २५ आदर्श शिक्षक ४ उत्कृष्ट शाळा असे एकूण २९ पुरस्काराचे वितरण करून शिक्षकांचा यथोचित गौरव केला जाणार आहे. नवी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार फौंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये माध्यमिक शिक्षकांमधून प्रतिभा पाटील, मलगोंडा मायगोंडा, शिवप्रसाद माळी, स्मिता पाटील, शुभांगी पाटील, शारदा पाटील, शुभांगी कोरे, छाया जगताप, तृप्ती पाटील, दादासो मोहिते व कुमार किल्लेदार आणि प्राथमिक शिक्षकांमधून राजकुमार शिंदे, नाभीराज व्हनवाडे, रघुनाथ कोळी, शब्बीर मोमीन, शशिकांत पाटील, प्रकाश महिंद, दादासो हनबर, महेश बन्ने, वंदना शिंदे, राजाराम पाटील, संजय कोळी, सुकुमार फडतारे, प्रकाश चौगुले, तबस्सुम पटेल इत्यादींची निवड करण्यात आली आहे .
आदर्श शाळा म्हणून प्राथमिकमध्ये विकास विद्यामंदिर, पाडळी व विद्यामंदिर मालेवाडी व माध्यमिक मध्ये संजय घोडावत पॉलीटेक्निक, अतिग्रे व महात्मा गांधी विद्यालय, रुकडी या शाळेंची निवड करण्यात आली आहे. यांना निवड पत्र देण्याचा कार्यक्रम माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच सदर पुरस्कार वितरण समारंभ तारीख कोरोनाचा वाढता समूह संसर्ग लक्षात घेता खबरदारी म्हणून लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती फौंडेशनचे सचिव संजय चौगुले यांनी दिली.

यावेळी जिल्हापरिषदेचे शिक्षण सभापती व फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीण यादव, महेश चव्हाण, तानाजी पोवार, अरविंद खोत, संग्रामसिंह निंबाळकर, संभाजी हांडे, दिपक मोरे, विजय भोसले, शीतल शिंदे, धनाजी पाटील, उदय शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.