दहावीच्या शेवटच्या पेपरनंतर विद्यार्थ्यांनी केला जल्लोष

    दहावी म्हणजे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातील पहिली पायरी. दहावीनंतरच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या वाटा खुल्या होतात. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीचा मंगळवारी शेवटचा भूगोल विषयाचा पेपर झाला. पेपर सुटल्यावर परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. दहा वर्ष सोबत असणारे मित्र-मैत्रीनी यांच्यासोबत सेल्फी काढून विद्यार्थानी आठवणी कैद करून ठेवल्या. फटाक्यांची आतषबाजी केली. काही ठिकाणी तर पाच दिवस अगोदरच विद्यार्थ्यांनु रंगपंचमी साजरी केली. जिल्ह्यातही सर्वत्र जल्लोष करण्यात आला. 
 १ मार्च ला सुरू झालेला शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील शेवटचा पेपर  २४ मार्चला झाला. पेपर संपल्यानंतर विद्यार्थी मोठ्या आनंदाने एकमेकांची गळाभेट घेताना दिसले. आता पुढे काय या विषयावर अनेक ठिकाणी चांगलीच चर्चा रंगलेली दिसली.
error: Content is protected !!