एआय मुळे नोकरीच्या संधी वाढतील: बँक ऑफ न्यूयॉर्क मेलचे डॉ.अनिश कुमार

नव तंत्रज्ञानाच्या या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे महत्त्व वाढत आहे.अर्थ, सेवा सुविधा,मनुफॅक्चरिंग, रिटेल, मनोरंजन, शिक्षण, आरोग्य,प्रवास,वाहतूक, लॉजिस्टिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडत आहेत. शिक्षकांनी एआय चे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.असे झाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील,असे प्रतिपादन बँक ऑफ न्यूयॉर्क मेलचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री मॅनेजर डॉ. अनिश कुमार यांनी केले.
‘ए आय: द कॅटलिस्ट ऑफ चेंज अक्रॉस इंडस्ट्रीज अँड द ब्ल्यूप्रिंट फॉर फ्युचर करियर्स’ या विषयावर संजय घोडावत विद्यापीठात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अभियांत्रिकी आणि एमबीए फायनान्सच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अंतर्विद्याशाखीय शिक्षण आत्मसात करण्याचा,सॉफ्ट स्किल विकसित करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, की विद्यार्थ्यांनी वास्तविक जगातील प्रकल्पांशी संलग्न राहणे गरजेचे आहे.जागतिक पातळीवर एआय मध्ये होत असलेल्या संशोधनामध्ये कुतूहल राखणे गरजेचे आहे.या युगात तंत्रज्ञानाशी स्वतःला जुळवून घेतले तरच विविध क्षेत्रात आपल्याला यश मिळेल याची खात्री त्यांनी दिली.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी डॉ.अनिश कुमार यांचे स्वागत केले. यावेळी कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या प्रमुख प्रा. दीपिका पाटील,डॉ.प्रा. महेश गायकवाड उपस्थित होते. यासाठी अध्यक्ष संजय घोडावत,विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!