हातकणंगले / प्रतिनिधी
आळते (ता . हातकणंगले ) येथील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे . त्या धर्तीवर आजपासुन गाव सलग ता . २७ ते २९ असे तीन बंद रहाणार असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे . त्यामुळे गावातील व्यवहार सलग दहा दिवस बंद आहेत . एका दिवसांत ६ रुग्ण सापडले असून गावात खळबळ उडाली आहे
आठवठ्यापुर्वी सापडलेल्या एकाच कुटुंबातील ५ रुग्णांचा समावेश असून अन्य एका कुटुंबातील पाच व अन्य दोन असेफ एकुण रूग्ण संख्या १२ झाली आहे . खबरदारी म्हणुन प्रशासनाने संपर्कात आलेल्या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल केले होते . त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता आज त्यातील १६ जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटीव्ह तर ७ जणांचे स्वॅब रिपोर्ट पॉझीटीव्ह आले . तसेच प्रशासनाने नागरीकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे … .