आळतेत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह; गाव हादरले

हातकणंगले / ता : 20

                आळते (ता .हातकणंगले ) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरी करणारा व राज्य शासनाने आदर्श कामगार म्हणून गौरविलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . आळते गावात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने सन्नाटा पसरला आहे . गावातील नागरिक गल्लोगल्ली घोळका करून चर्चा करीत आहेत . त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे .
           बाधित व्यक्ती 53 वर्षाची असून त्याला अकरा तारखेला ताप आला होता . त्यानंतर त्याने गावातील खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतले . मात्र सुधारणा न झाल्याने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात 6 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले . त्याच्यावर उपचार केलेल्या आळते येथील डॉक्टरना होमक्वांरटाइन होण्याच्या सूचना दिल्या आहेत . त्याचबरोबर त्याच्या घरातील सर्वांना क्वांरटाईन करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले . कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काही गल्ल्या सील केल्या असुन गावामध्ये घ्याव्या लागणाऱ्या दक्षतेबाबत रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायतीमध्ये आधिकारी व पदाधिकारी यांची बैठक सुरू होती . 

error: Content is protected !!