बाळासाहेब पाटील (दादा) हायस्कूलचा दहावीचा निकाल 98.30 %

हातकणंगले/ताः २९

मुख्याध्यापिका
सौ. उळागड्डे ए.ए.

      जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ आळते तर्फे संचलित बाळासाहेब पाटील (दादा) हायस्कूलचा दहावीचा निकाल 98.30 % लागला आहे . विद्यालयातील खुशबू बाबासाब मुजावर 94 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. कु. अनुष्का अविनाश मजलेकर हिने 93.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तसेच 93.20% गुण मिळवून कु. स्वालिहा रफीक मुजावर तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. चौथा क्रमांक 92. 40 % गुणासह दोन विद्यार्थ्यांनींनी मिळविला. यामध्ये कु.श्रेया सुनील चव्हाण व कु. प्रणाली बाळगोंडा पाटील यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कु. साक्षी शांतिनाथ वसगडे हिने 90% गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला.
         सर्वच विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन श्री. संजयकुमार पाटील , व्हा. चेअरमन,सचिव तसेच मुख्याध्यापिका सौ. उळागड्डे ए.ए. , पर्यवेक्षक श्री .सी.बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच 10 वी चे वर्गशिक्षक शिखरे सर, श्री साळुंखे सर ,सौ.पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे अध्यापक- अध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले .

खुशबू मुजावर
94 %

अनुष्का मजलेकर 93.60%

स्वालिहा मुजावर
93.20


sgp
error: Content is protected !!