आळते येथील मावा विक्रेत्यावर कारवाई

हातकणंगले /ताः १२

              आळते ( ता.हातकणंगले ) येथील अमोल बाबासो मजलेकर (वय 35 ) हा मावा विक्री करीत असल्याची बातमी हातकणंगले पोलीसाना समजली . तात्काळ पोलीसांनी त्याच्या राहत्या घरी छापा टाकून कारवाई केली . त्याच्याकडून 13,000 रुपयांचा तंबाखुजन्य पदार्थासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  सदरची कारवाई  पोलीस उपअधीक्षक, श्री. प्रणिल गिल्डा, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पाटील,  राकेश इंदुलकर, प्रांजल कांबळे, दिग्विजय देसाई यांनी केली.

error: Content is protected !!