आळतेत सहावा पॉझिटीव्ह , पाच जणांमध्ये लक्षणे अढळ नाहीत ?

आळते /ताः २३

          आळते (ता.हातकणंगले) येथे आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे . तर सायंकाळपर्यंत अन्य दहा जणांचे स्वॅब रिपोर्ट येणार आहेत . आतापर्यंत एकुण सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असुन त्यातील पाच जण एकाच कुटुंबातील आहेत . मात्र एक बाधित वगळता अन्य पाच रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे दिसुन येत नाहीत ? आज पॉझिटीव्ह आलेली व्यक्ती जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागात नोकरी करत आहे . पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये वाढ होत असलेने आळते गावात घबराट पसरली आहे .


श्री संत रोहीदास तरूण मंडळाच्या वतीने रोगप्रतिकारक शक्तीवर्धक औषधाचे घरोघरी वाटप करताना मंडळाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व अन्य मान्यवर

           ग्रामपंचायतीच्या वतीने व समाजातील दानशुर व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने गावातील लोकांची थर्मल टेस्ट , औषधे , रोगप्रतिकार शक्तीच्या होमिओपॅथि गोळ्या व फवारणी सुरू आहे . तसेच संजय घोडावत उद्योग समुहाच्या वतीने संपुर्ण गावात छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे श्री . संत रोहीदास तरूण मंडळाने पुढाकार घेवुन होमिओपॅथि रोगप्रतिकारक गोळ्याच्या पाकीटाचे वाटप केले आहे . त्याचप्रमाणे गावातील सेवाभावी संस्था व मंडळाच्या वतीने स्वच्छतेसह आपआपल्या स्तरावर मदतीचा हात देत आहेत


संजय घोडावत उद्योग समुहाचे वतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने औषध फवारणी सुरू असताना

error: Content is protected !!