प्रवेशबंदीची परवानगी द्यावी

हातकणंगले / ताः २०

          श्री . क्षेत्र रामलिंग ,धुळोबा, कुंथूगिरी व अलंमप्रभू देवस्थान बंद असतानाही इचलकरंजी व परिसरातील हजारो युवक , युवती , भावीक व पर्यटक फिरणेसाठी येत आहेत .त्यामूळे कोरोणाचा फैलाव जास्त होण्याचा धोका आहे . तरीही यामार्गावर व देवस्थानच्या डोंगर परिसरामध्ये हुल्लडबाजी सुरू आहे . या सर्वांना प्रवेशबंदी करण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करणेसाठीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार सानप याना देणेत आले .यावेळी आळतेचे ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य इंगवले ,पुंडलिक बिरंजे , राजू सुर्यवंशी व ग्रामविकास अधिकारी विलास फोलाणे उपस्थित होते .

नायब तहसिलदार सानप यांना निवेदन देताना अजिंक्य इंगवले , विलास फोलाणे , नारायण बिरंजे व राजु सुर्यवंशी .

error: Content is protected !!