अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे मुंबईत निधन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे सोमवारी निधन झाले आहे. सोमवारी राजूबेन यांनी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. (Union Minister Amit Shah elder sister passes away in Mumbai)

काही महिन्यापूर्वी राजूबेन यांचे फुफ्फुस ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बहिणीच्या मृत्यूनंतर अमित शाह यांनी आपले सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. आज त्यांचा गुजरातच्या बनासकांठा जिल्हा आणि गांधीनंगर दौरा नियोजित होता.

फुफ्फुस ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. भाजपच्या एका नेत्याने माहिती दिली की, अमित शहा यांच्या मोठ्या बहिणीचे निधन झालंय. त्यामुळे त्यांनी नियोजित दौरा रद्द केलाय. अमित शहा अनेकदा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये येऊन बहिणीना भेटून गेले होते. त्यांची प्रकृती खालावत होती. (Latest Marathi News)

error: Content is protected !!