संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजीनियरिंगच्या विद्यार्थीनीला “स्नायडर इलेक्ट्रिक कंपनीकडून” 3.75 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मंजूर.

जयसिंगपूर : शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजीनियरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागाची “ऋतुजा कांबळे” या विद्यार्थीनीची ‘स्नायडर इलेक्ट्रिक प्रा.लि, मुंबई कंपनीने 3.75 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज देणून निवड केली आहे.

दरवर्षी संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. स्नायडर इलेक्ट्रिक, मुंबई ही एक प्रख्यात कंपनी असून भारतात तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. इलेक्ट्रिकल क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे.

नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एचआर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थीनीची निवड झाली आहे. या निवडीसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आशिष पाटील, समन्वयक, प्रा. दीपक कांबळे, प्रा. मयुरेश पाटील, प्रा. प्रास्वप्नाली साळुंखे, प्रा. आकाश घस्ते यांचे सहकार्य लाभले.

या यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले, प्राचार्य, डॉ. विराट गिरी, अकॅडमीक डीन. प्रा. प्रशांत पाटील, इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभाग प्रमुख, प्रा. नितीन पाटील यांनी ऋतुजा कांबळेचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!