पंढरपुरात आढळला पुरातन ऐतिहासिक ठेवा

पंढरपुरच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या पुरातन मंदिर जतन संवर्धनासाठीचे काम सुरू आहे. यासाठी मंदिराला पुरातन स्वरुप प्राप्त होण्यासाठी नवीन बांधकाम पाडुन व खोदकाम करुन पुरातन वैभव जतन करण्यासाठीचे कामकाज सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. यासाठी बाजीराव पडसाळी भागात खोदकाम केले असताना कांही दगडी रांजणसदृश्य वस्तु आढळुन आल्या. पुरातत्व खात्याच्या नियम आणि निकषाला अधिन राहुन काळजीपुर्वक खोदकाम करावे. नेमके या शिलालेखांवर कोणत्या लिपीत आणि काय लिहिलेले आहे याचा अभ्यास करुन पुरातत्व खात्याने शोध लावणे अत्यावश्यक आहे.

error: Content is protected !!