इचलकरंजी /ता: ७

केंद्र सरकारने व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कंटेनमेंट झोन सोडून अन्य भागातील उद्योग सुरू ठेवणेस परवानगी दिलेली आहे . तसेच कोरोना संदर्भातील दिलेल्या सर्व अटीचे व नियमांचे पालन करून उद्योगधंदे सुरू आहेत . तरी यड्राव (ता.शिरोळ ) येथील पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मधील सर्व उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्याची विनंती पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बागणे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे .
यड्राव ग्रामपंचायतीने पार्वती इस्टेटमधील उद्योजकांना ८ जुलै ते 13 जुलै अखेर उद्योगधंदे बंद ठेवण्याचे लेखी पत्र दिले आहे . त्याला अनुसरून असोसिएशनने जिल्हाधिकारी यांचेकडे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी यड्राव ग्रामपंचायतीला आदेश करण्याची मागणी केली आहे . मागणीच्या प्रति प्रांताधिकारी इचलकरंजी व शिरोळ तहसीलदार यांना दिल्या आहेत.