वंचित पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरेंच्या नावाची घोषणा

    बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाने दिलेल्या उमेदवारीच्या माध्यमातून पुणे शहरातून वंचित चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येण्याचा विश्वास वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे व्यक्त केला.

  लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर ते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. 

  काल  वंचित च्या पाच उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यात पुण्याच्या जागेसाठी  वसंत मोरे यांचे आले या पार्श्वभूमीवर वंचित पुणे शहराच्या वतीने सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उमेदवार  वसंत मोरे यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. याप्रसंगी मोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

वंचित बहुजन समाजाच्या नागरिकांची वज्रमूठ बांधत प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवून वंचित च विजय १००% साकारणार असे मोरे म्हणाले . शहरातील मराठा समाजाच्या आरक्षणापसून विविध प्रश्नांवर सुरुवातीपासूनच मी आवाज उठवला आहे. जारांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर यांची ही मराठा समाजाविषयी एकच भूमिका आहे. त्यामुळे मराठा समाजही मला नक्कीच मदत करेल. सर्वच राजकीय, सामजिक कार्यकर्त्यांची रात्री अपरात्री माणुसकीच्या माध्यमांतून कामे केली ही माझी जमेची बाजू असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले आहे.

error: Content is protected !!