माई बाल विद्यामंदिरात वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

   इचलकरंजी येथील माई महिला मंडळ संचलित श्रीमती बाळाबाई केशवलाल शहा माई बाल विद्यामंदिरात 32 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू उमेश गजानन सातपुते, संस्थेच्या उपाध्यक्षा मा माधुरी मर्दा , मुख्याध्यापिका  शैला कांबरे मॅडम यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा शिक्षक पारसे सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातून वाजत गाजत क्रीडा ज्योत आणून उद्घाटन सोहळ्याची सुरुवात क्रीडा ज्योतीच्या आगमनाने व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योतीच्या पूजनाने झाली. मुख्याध्यापिका शैला कांबरे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले व विद्यार्थ्यांना ‘खिलाडू वृत्तीने खेळ खेळा ‘असा संदेशही दिला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व खेळाडूंना क्रीडा शपथ क्रीडा शिक्षक श्री महेश पारसे सर यांनी दिली. विद्यार्थ्यांना नेहमी खेळ खेळा, तसेच मुलींनीही सर्व खेळ प्रकारात सहभाग घ्यायला हवा असा मोलाचा संदेश प्रमुख पाहुणे उमेश सातपुते यांनी दिला. संस्थेच्या उपाध्यक्षा माधुरी मर्दा यांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीना तोसनीवाल व सेक्रेटरी निकिता शहा यांचे मार्गदर्शन लाभले. आभार शाळेतील शिक्षिका सौ चौगुले मॅडम यांनी मानले. सूत्रसंचालन सौ कवटगे मॅडम यांनी केले.

error: Content is protected !!