काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, ऑलिम्पिक मेडल विजेता विजेंदर सिंग यांचा भाजप मध्ये प्रवेश

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बॉक्सिंगमधील भारताचे पहिले ऑलिम्पिक मेडल विजेता विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांनी त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुख्यालयात त्यांचा पक्षात समावेश केला आहे.

यावेळी विजेंदर सिंग म्हणाले की, ‘सर्वांना राम राम. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करत आहे. एक प्रकारे हे घरवापसी आहे.
विजेंदर सिंग यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक दक्षिण दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली होती, पण तेथे त्यांचा पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे नाव मथुरा येथून पक्षाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, जिथून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा निवडणूक लढवत आहेत.विजेंदर सिंग हा भारतातील हरियाणा येथील जाट समाजातून येतो. त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1985 रोजी हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील कालुवास नावाच्या गावात झाला. त्याचे वडील महिपाल सिंग बेनिवाल हे हरियाणा रोडवेजमध्ये बस ड्रायव्हर आहेत आणि आई कृष्णा देवी गृहिणी आहेत. विजेंदरचा मोठा भाऊ मनोज हा देखील बॉक्सर आहे. विजेंदरने आपले प्राथमिक शिक्षण कालुवास येथील शाळेतून पूर्ण केले.

error: Content is protected !!