चिंता वाढली! देशात Monkeypox चा पहिला रुग्ण आढळला

MSK Online News :
    कोरोना म्हातारीच्या संकटातून आताचं थोडं फार बाहेर पडत आहोत तोच देशात मंकीपॉक्स विषाणूचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. केरळमधील कोल्लम इथल्या एका रुग्णाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. रुग्णाच्या पालकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, यूएई देशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत.

संग्रहित छायाचित्र

    त्याचे नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे (National Institute Of Virology) पाठवण्यात आला होते. नमुन्याच्या तपासणीत या रुग्णामध्ये मंकीपॉक्सचे विषाणू आढळून आले. रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंकीपॉक्सची पहिलं प्रकरण आढळताच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केरळमधील कोल्लम इथं तातडीने आरोग्य तज्ज्ञांची टीम पाठवली आहे.

    केंद्रीय आरोग्य पथकात नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC)चे तज्ज्ञ, नवी दिल्लीतल्या आरएमएल हॉस्पिटलचे डॉक्टर आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. केंद्रीय पथक टीम केरळच्या आरोग्य विभागाबरोबर काम करेल. या विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचं काम हे पथक करेल.
मंकीपॉक्सची प्रामुख्याने ताप, डोकेदुखी, शरीरावर फोड्या येणं अशी प्रमुख लक्षणं आहेत. मंकीपॉक्स हा विषाणू आहे. जो पहिल्यांदा माकडांमध्ये सापडला होता.
    जगभरात मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून गेल्या आठवड्यात यात 77 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 6,000 पेक्षा जास्त झाली आहे. तर आफ्रिकेच्या काही भागात या विषाणूमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.

error: Content is protected !!