वारणानगर/प्रतिनिधी
समाजातील मुलांनी अभ्यासाच्या जोरावर प्रशासनामध्ये येवून समाज व देशाची सेवा करावी. असे आवाहन कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी केले. जाखले येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी राष्ट्रीय परिवहन महामंडळ निवृत्त विभागीय भांडार अधिकारी माणिकराव धोंगडे होते.

यावेळी स.पो.नि. शरद बनसोडे व माणिकराव घोंगडे यांच्या हस्ते गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील अजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ धोंगडे, माजी सरपंच आप्पा चौगुले, अशोक धोंगडे,राजाराम धोंगडे, रगुनाथ धोंगडे, किरण धोंगडे, दशरथ धोंगडे, अमित धोंगडे सुनील धोंगडे,पंडित धोंगडे, संजय कुरणे, रंगराव धोंगडे, बजरंग धोंगडे, दीपक धोंगडे,गणपती धोंगडे आदी उपस्थित होते.प्रा.बाळासाहेब धोंगडे यांनी आभार मानले.