ई-आर-1 विवरणपत्र 31 जानेवारीपर्यंत भरण्याचे आवाहन

सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगिकृत व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र 31 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
डिसेंबर 2023 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरूष, स्त्री एकूण) संकलीत करण्याचे काम चालू आहे. सांख्यिकी विभागाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. ई-आर 1 विवरणपत्र सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ पहावे. या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर अथवा या कार्यालयाचे किशोर जाधव, वरिष्ठ लिपिक, भ्रमणध्वनी क्रमांक 7977538129 यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

error: Content is protected !!