अग्निवीरवायू पदाच्या परिक्षेसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

भारतीय वायूसेनेच्या अग्निवीरवायू योजनेअंतर्गत अग्निवीरवायू म्हणून भारतीय वायूसेनेत प्रवेश घेवू इच्छिणा-या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या जाहिरातीद्वारे अग्निवीरवायू पदाच्या परिक्षेकरीता http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर दिनांक 17 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जास्तीत-जास्त इच्छुक उमेदवारांनी या योजनेत नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

error: Content is protected !!