३० एप्रिल – दिनविशेष

१४९२: स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.

१६५७: शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.

१७८९: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.

१९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.

१९७७: ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

१९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.

१९९५: उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.

२००९: ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

१९२१: जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म.

१९२६: मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म. 

१९८७: भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्म.

१०३०: तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहंमद गझनी यांचे निधन. 

१८७८: साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.

१९१३: व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन. 

१९४५: जर्मनीचे नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली. 

संग्रहित माहिती

error: Content is protected !!