हातकणंगले/ प्रतिनिधी
आळते (ता.हातकंणगले) येथील जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भाऊसो चौगुले बाल विद्या मंदीर च्या विद्यार्थ्यानी महाराष्ट् स्टेट टॅलेट सर्च प्रज्ञाशोध (MSTS) परिक्षेत उत्तुंग यश संपादित केले आहे.अरीष जमाल नदाफ यांने राज्यात तिसरा क्रंमाक मिळवुन यश मिळविले आहे.
शाळेतील पहिले ते चौथी मधील ८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते . यातील अकरा विद्यार्थी जिल्हा गुणवता यादीत चमकले आहेत. तर इतर सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने उर्त्तीर्ण झाले आहेत . शाळेचा MSTS परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे .
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन संजय पाटील , व्हा . चेअरमन दादा चौगुले , सचिव अविनाश मजलेकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तेजस्विनी विनयकुमार पाटील, परीक्षा विभाग प्रमुख सौ. दिपाली सागर पाटील MSTS परीक्षा प्रमुख रमेश कांदेकर यासह शाळेच्या सर्व अध्यापक याचे मोलाचे मार्गदर्शन लाभाले आहे . यशामुळे शाळेचे व यशस्वी विद्यार्थीचे सर्वत्र कौतुक होत आहे .