मध्यप्रदेश राज्यातील रतलम येथे झालेल्या 13 व्या ज्युनियर मिस्टर इंडिया (Junior Mr. India) स्पर्धेत हातकणंगलेचा अर्जुन मोंगले याचा 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडेरेशन यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.

याविषयी बोलताना अर्जुन चे वडील विजय मोंगले म्हणाले कि, " त्याच्या अथक प्रयत्नातून हे यश त्याला मिळाले.दररोज सकाळी 4 तास आणि संद्याकाळी 2 तास जिम मध्ये घाम गाळणे, जेवणार कडक कंट्रोल ठेवणे, यामुळे हे शक्य झाले. NS जिम चे मालक श्री. नागेश सुतार सर यांच्या मार्गदर्शनामुळे तो ही उतुंग झेप घेऊ शकला.गेली 5 महिने पासून तो यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्याला हा किताब मिळाला.त्याचा आयुष्यातील हा सर्वोच्च पदक असून त्याच्या विजयाचे सर्व श्रेय NS फिटनेस चे श्री. नागेश सुतार सर यांना जातो व त्याचा पुढील वाटचालीस शुभेच्छा.
यावेळी बाबुजमाल तालीम मंडळ, संभाजी ब्रिगेड, श्री सचिन बोराडे, श्री. योगेश पाटील,श्री. रणजित धनगर.श्री. अरुण कुमार जाणवेकर श्री. दिपक वाडकर, श्री. रावसो कारंडे, श्री. अतुल मंडपे, श्री. बिरनाळे सर, श्री. बत्तू जाधव, श्री. सुभाष चव्हाण, श्री. गुरूदास चव्हाण, श्री गुरु खोत, गुंडू जाधव यांनी मदत केली असून त्यांच्या मदती मुळे हे यश संपादन करू शकला. या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी राहीन.
अर्जुन ला लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती. वयाच्या 7 वर्षा पासून तो बाबुजमाल तालीम मंडळ येते व्यायाम करत असे.2022 मध्ये त्याने इचलकरंजी येथील NS फिटनेस क्लब मध्ये भरती झाला.2 महिने मधील त्याची प्रगती आणि कष्ट पाहून प्रशिक्षक श्री. नागेश सुतार सर यांनी बॉडी बिल्डिंग कडे जाण्याचा सल्ला दिला. पुढील महिन्याभरात जुनिअर महाराष्ट्र श्री 2022 च्या स्पर्धा मुंबई येथे लागल्या आणि 65 किलो वजनी गटात त्याला सुवर्ण पदक मिळवले आणि येथून त्याचा बॉडी बिल्डिंग चा प्रवास चालू झाला.
त्यानंतर पोंडिचेरी येथे झालेल्या मिस्टर इंडिया स्पर्धेत 5 वा क्रमांक आला. त्याचबरोबर सांगरुळ येथे छत्रपती श्री 2022 मध्ये प्रथम क्रमांक, वडगाव श्री 2022 मध्ये द्वितीय, क्रांती दादा श्री 2022 मध्ये द्वितीय, शिवाजी युनिव्हर्सिटी 2023 मध्ये प्रथम क्रमांक, RV श्री 2023 मध्ये द्वितीय, मुंबई येथे राज्य स्तरीय खुल्या गटात पाचवा, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत भारतात पाचवा तसेच या वर्षी जुनिअर महाराष्ट्र श्री 2023 मध्ये सुवर्ण पदक मिळवले.
त्याच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून त्याच्यावर शुभेच्यांचा वर्षाव होत आहे