रुई ता.१५ ( वार्ताहर )
येथील गावापासून स्मशानभूमीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर आजपर्यंत लाईटची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सदरच्या रस्त्यावर लाईटची व्यवस्था करण्यात यावी या मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण विभाग) श्री. अकीवाटे यांना देण्यात आले.

तसेच या मागणीमध्ये रूकूमशहा परिसरातील बऱ्याच ठिकाणी विद्युत तारांना जवळ पडला असून अवकाळी पावसावेळी जोरदार सुटणाऱ्या वाऱ्यामुळे सदर ठिकाणी वारंवार स्पार्क होत असतात त्यामुळे या ठिकाणची देखील पाहणी करून धोकादायक प्रसंग घडनेपूर्वी येथील समस्या दूर कराव्यात अशीही मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी तात्काळ पाहणी करून अडचण दूर करण्यात येईल व त्याचबरोबर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार पोल टाकून लाईटची व्यवस्था लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी ग्रा. प सदस्य अवधूत कुलकर्णी, दिपक उपाध्ये, राजू बेनाडे, माजी सदस्य सर्जेराव पाटणकर, अंजुम मुजावर, संजय पाटणकर, अरुण आवटे आदी उपस्थित होते.