पुलावर ताबा सुटल्याने दुचाका पुलावरून थेट नदीत

  खडक कोगे बंधा-यावरून चालक एकनाथ बापू चव्हाण व दिपक कांबळे दोघे कामावर जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटलेने दूचाकी थेट वाहत्या पाण्यात पडली दैव बलवत्तर म्हणुन दोघेही वाचलेत. त्यावेळी धरणावर उपस्थित नाथाजी कांबळे या युवकांने प्रसंगावधान राखत दोरीच्या सहाय्याने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. नाथाजी कांबळे यांच्या सतर्कतेने दोघांचे जीव वाचले म्हणून त्यांचेवर ग्रामस्थांतून शुभेच्छांचा वर्षाव करणेत येत आहे. दोघांनाही दुखापत झालेने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवण्यांत आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण धरणाला संरक्षक कठडा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
error: Content is protected !!