आश्रमशाळेची फिरदोस शकील सनदी हातकणंगले केंद्रात द्धितीय

हातकणंगले /ताः ३०

        संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूर, संचलित माध्यमिक आश्रमशाळा हातकणंगले या शाळेचा दहावीचा निकाल 100 % लागला आहे शाळेच्या फिरदोस शकील सनदी या विद्यार्थिनीने 97 . 60 % मार्क मिळवुन हातकणंगले केंद्रात द्धितीय क्रमांक पटकाविला असुन शाळेत प्रथम क्रमांकाने यश मिळविले आहे . द्वितीय क्रमांक कु . रोशनी राजेंद्र सोनसळे 96.40% व तृतीय क्रंमाक कु . जोया इम्रान मुजावर 94.60% यांनी पटकाविला आहे . चौथ्या क्रमांकासाठी कु .अहिल्या कृष्णकांत हापटेव राहुल किशोर राठोड या दोघांनी समान 94.0% गुण मिळविले .पाचवा क्रमांक कु .प्रियांका चंद्रकांत इरकर 89.60% हिने मिळविला . परीक्षेस एकुण 91 विद्यार्थ्यी बसलेले त्यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त – 36 तर प्रथम श्रेणीत – 39 विद्यार्थ्यी आले आहेत.
        माजी मंत्री व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे ( आप्पा ) यांचे आशिर्वादाने ,संस्थेचे सचिव चिमण डांगे यांची प्रेरणा व संस्था व्यवस्थापक सुनिल शिणगारे व प्रशासन अधिकारी शंकर स्वामी तसेच संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मुसाई , सौ .हिराताई मुसाई यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे .शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिरसटइ. १० वीचे वर्गशिक्षक , विषयशिक्षक यांच्या अथक परिश्रमातून व सजग पालकांच्या सहकार्याने शाळेचा निकाल 100 % यश मिळाले आहे .

फिरदोस
सनदी

रोशनी सोनसळे

जोया
मुजावर

error: Content is protected !!