गंगावेश येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूहल्ला

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये ऋतुराज धनंजय वडणगेकर (वय २२, रा. गंगावेश, कोल्हापूर) हा जखमी झाला. रविवारी (दि. ३१) रात्री साडेसातच्या सुमारास गंगावेशीतील शाहू उद्यान मंडळ येथे ही घटना घडली. रविवारी सायंकाळी ऋतुराज मोबाईलवर गेम खेळत बसला होता. यावेळी त्याच्यावर रितेश सुनील काळे (रा. गंगावेश) याने हल्ला केला. ऋतुराज याच्या पाठीवर गंभीर जखम झाली. याबाबत जखमी ऋतुराज याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी हल्लेखोर काळे याच्यावर गुन्हा दाखल केला.

error: Content is protected !!