कोरोना महामारीच्या काळात अविनाश बनगे यांचे कार्य उल्लेखनीय- उपअधीक्षक प्रणिल गिल्डा

हातकणंगले / प्रतिनिधी
     चोकाक (ता.हातकणंगले ) येथील अविनाश सहदेव बनगे यांनी कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत हातकणंगले पोलीस ठाण्यास मास्क, सॅनिटायझर, व जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप करून पोलीस प्रशासनाबद्दल आपुलकी दाखवली. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले .
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोना काळात पोलीस प्रशासनास मदत केलेल्या मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

चोकाक येथील अविनाश बनगे यांचा सत्कार करताना पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा

    अविनाश बनगे यांचा सत्कार पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी दिग्विजय देसाई,मधुराज धम्म दीक्षित, यांचेसह पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!