समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना पुरस्कार जाहीर

कोल्हापूर :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार पात्र व्यक्ती व संस्थांना सन २०१९-२०, सन २०२०-२१, सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या चार वर्षामधील विविध पुरस्कार शासनाने दि. ७ मार्च, २०२४ रोजी जाहीर केले आहेत. पुरस्कार नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्टस (NCPA), जमशेदजी भाभा नाट्यगृह, एनसीपीए मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई येथे दि. १२ मार्च २०२४ रोजी देण्यात येणार आहेत. पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांना शासनामार्फत यथोचित सन्मान करुन गौरविण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील खालील व्यक्ती व संस्थांना पुरस्कार मिळाले आहे-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, सन २०१९-२० साठी नामदेव बाबु कांबळे, सुभेदार रामजी आंबेडकर हौ. सोसायटी, विचारे माळ, कोल्हापूर,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, सन २०१९-२० साठी सिद्राम कृष्णा कांबळे, मु.पो. आनूर ता. कागल जि. कोल्हापूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार २०१९-२० साठी कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्राम विकास प्रबोधिनी, सैनिक टाकळी, ता. शिरोळ जि. कोल्हापूर,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन २०२१-२२ साठी डॉ.प्रताप बाजीराव पाटील, जयदत्त ज्ञानदेव हौसिंग सोसायटी,ताराबाई पार्क, कोल्हापूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार २०२१-२२ साठी आयु. भिमराव दौलत कांबळे, मु.पो. सरवडे ता. राधानगरी जि.कोल्हापूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार २०२१-२२ साठी प्रा.डॉ. महेंद्रकुमार आनंदराव जाधव, मु.पो. सांगवडे ता. करवीर,जि. कोल्हापूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन २०२२-२३ साठी डॉ.अनिल परशराम सिध्देश्वर, महाजन कॉलनी, मुरगूड ता. कागल जि. कोल्हापूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन २०२२-२३ साठी श्रीम. हेमलता सुभाष पोळ, सुभाषनगर, कोल्हापूर,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन २०२२-२३ साठी बापूसाहेब देवाप्पा कांबळे, विचारेमाळ झोपडपट्टी, कोल्हापूर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन २०२०-२१ साठी सर्जेराव मारुती अवघडे, मु. चिमगांव पो. मुरगूड, ता. कागल जि. कोल्हापूर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन २०२१-२२ साठी बाळू शिवाजी गायकवाड, मु. पो. हेरवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन २०२१-२२ साठी रावण मार्तंड समुद्रे, मु. पो. किणी ता. हातकणंगले जि.कोल्हापूर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन २०२१-२२ साठी प्रा. डॉ. अरुण विठ्ठल पौडमल, ए वॉर्ड, २/१२, निकम पार्क, देवकर पाणंद, कोल्हापूर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन २०२१-२२ साठी कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्राम विकास प्रबोधिनी, सैनिक टाकळी, ता. शिरोळ जि. कोल्हापूर,

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन २०२२-२३ साठी डॉ. उत्तम कोंडिबा सकट, प्लॉट नं. २४, आर. बी. पाटील कॉलनी, गडमुडशिंगी ता. करवीर जि. कोल्हापूर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन २०२२-२३ साठी डॉ. शरद राजाराम गायकवाड, श्रीकृष्ण रेसिडेन्सिल, इंगळेनगर, कोल्हापूर

error: Content is protected !!