श्री संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर; उद्या वितरण

श्री संत गाडगे महाराज यांच्या 148 वी जयंती निमित्त संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने तारदाळ परिसरात स्वछता अभियान राबविण्यात आले. त्याचबरोबर परीट समाजाबरोबरच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना वह्यावाटप, शिष्यवृत्ती, जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ समाज बांधव, ज्येष्ठ समाज भगिनी, ज्येष्ठ दांपत्य व बहुजन समाजातील व्यक्तींनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा रविवार 10 मार्च रोजी नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. ज्या भागातून पालखी सोहळा निघणार त्या भागात संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान घेण्यात येते. त्या अनुषंगाने संस्थेचे सभासद शाहीर संजय जाधव यांच्या माध्यमातून तारदाळ परिसरात स्वच्छता अभियान घेण्यात आले. तर रविवार 10 मार्च रोजी सकाळी 11.30 संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुरुहीनशेट्टी भवन येथे परीट समाजाबरोबरच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना वह्यावाटप, शिष्यवृत्ती, जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ समाज बांधव, ज्येष्ठ समाज भगिनी, ज्येष्ठ दांपत्य व बहुजन समाजातील व्यक्तींनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आनंदराव शिंदे यांनी दिली. तसेच यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी माजी कृषीविकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अनिल शिवराम परीट (समाजकार्य), रामचंद्र केशव निमणकर (शैक्षणिक), सौ. ज्योती सुनिल सांगले (कलारत्न), सौ. अलका शेलार-खोचरे (सांस्कृतिक) यांची निवड करण्यात आली आहे.
स्वछता अभियानासाठी माजी अध्यक्ष विनायक यादव, सल्लागार कमिटी सदस्य अरूण यादव, उपाध्यक्ष सुभाष परिट, सचिव प्रकाश शिंदे, प्रविण परीट, प्रमोद परिट, निवास परिट, एकनाथ परिट, दिलीप शिंदे, संगम शिंदे यांनी परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमास तारदाळचे सरपंच, उपसरपंच, स्वच्छता अभियान विभागाकडील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!