आयुर्वेदिक आरोग्य शिबिर उत्साहात

इचलकरंजी येथील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब आणि पतंजली योग समितीतर्फे आयुर्वेदिक आरोग्य शिबिर झाले. डॉ. अमित नेसरी, डॉ. नीता चौगुले, डॉ. ममता पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला. या शिबिराच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्व पटवून देण्याचा उद्देश असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. परिसरातील सर्वसाधारण कुटुंबातील रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. प्रकाश सातपुते, शिवबसू खोत, विजय पोवार, रवी शर्मा, संजय सातपुते, जयप्रकाश साळगावकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!