अमृतकलशच्या वतीने आयुर्वेदिक आरोग्य शिबीर

इचलकरंजी/प्रतिनिधी –

पतंजलीच्या अमृतकलश औषधालयाच्या वतीने व रोटरी सेंट्रल एक्झिक्युटीव्ह प्रोबस क्लब आणि पतंजली योग समिती इचलकरंजी याचे संयुक्त विद्यमाने नुकतेच आयुर्वेदिक आरोग्य शिबीर संपन्न झाले.
यावेळी पतंजलीचे कोल्हापूर येथील डॉ. अमित नेसरी, यड्राव येथील डॉ. निता चौगुले तर इचलकरंजीच्या डॉ. ममता उदगोंडा पाटील यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून भगवान धन्वंतरीची पुजा करून शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील सर्वसाधारण कुटुंबातील रूग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अशी शिबीरे सातत्याने भरवून सामान्य नागरिकांची सोय करावी, असे आवाहन कार्यकमाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी केले.
यावेळी रोटरी प्रोबसचे अध्यक्ष शिवबसू खोत, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विजय पोवार व मिडीया प्रमुख रवि शर्मा, तसेच संजय सातपुते, जयप्रकाश साळगांवकर, हेमंत कवठे, शशिकांत बडवे, सुनिल सातपुते यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!