‘कोजिमाशि’च्या चेअरमनपदी बाळ डेळेकर तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश कोकाटे बिनविरोध

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश कोकाटे यांची तर व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. या निवडी शिक्षकनेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. बैठकिच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णयअधिकारी सुनील धायगुडे होते. निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारीअधिकारी जयवंत कुरडे यांनी केले.

शाहुपुरील मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकित चेअरमनपदासाठी बाळ डेळेकर व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रकाश कोकाटे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. चेअरमन पदासाठी बाळ डेळेकर यांचे नाव संचालक राजेंद्र रानमाळे यांनी तर व्हाईस चेअरमन पदासाठी प्रकाश कोकाटे यांचे नाव संचालक अविनाश चौगले यांनी सुचविले.

निवडीवेळी संचालक राजेंद्र रानमाळे ,दत्तात्रय घुगरे,अनिल चव्हाण ,प्राचार्य श्रीकांत पाटील ,मदन निकम ,सुभाष खामकर ,अविनाश चौगले , दिपक पाटील , राजेंद्र पाटील , श्रीकांत कदम , जितेंद्र म्हैशाळे, शरद तावदारे , उत्तम पाटील , पांडुरंग हळदकर , मनोहर पाटील , सचिन शिंदे , राजाराम शिंदे , सौ .ऋतुजा पाटील , शितल हिरेमठ आदीसह प्रशासन अधिकारी उत्तम कवडे , संगणक अधिकारी नितीन शिंदे उपस्थित होते

error: Content is protected !!