भारत टेक्स 2024 प्रदर्शनातुन वस्त्रोद्योगातील समग्र प्रगतीचे दर्शन – वस्त्रोद्योग आयुक्त रूपराशी

भारतीय वस्त्र उद्योगातील सर्व घटकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे. यामुळे वस्त्रोद्योगातील सर्व क्षेत्राच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत आहे. याचे दर्शन नवी दिल्ली येथे 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवरी 2024 दरम्याण होणार्‍या भारत टेक्स या जागतिक दर्जाच्या प्रदर्शनात होणार आहे. यामध्ये इचलकरंजीतील उद्योजकांनी आपली वस्त्रोउत्पादने सादर करावीत आणि उद्योजकांनी या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातून माहिती घेऊन उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त रूप राशी यांनी व्यक्त केले.


नवीदिल्ली येथे फेब्रुवारी अखेरीस केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने भारत टेक्स 2024 या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याबाबत पिडीक्सिल या संस्थेच्या वतीने इचलकरंजीतील डीकेटीई येथे रोड -शोचे व या प्रदर्शनाच्या प्रचार व प्रसाराचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून रूप राशी बोलत होत्या. भारतीय वस्त्र उद्योग सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती करत आहे. अशावेळी शाश्‍वत उद्योग कसा होईल याकडे लक्ष देऊन पर्यावरणाचे भान जपले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचे वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गोडीलकर यांनी भारत टेक्स प्रदर्शनात महाराष्ट्रातील वस्त्र उद्योजक जास्तीत संख्येने सहभागी होतील यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग गतीने प्रगती करीत आहे. ही झेप पाहता इचलकरंजी हेच जगाचे मँचेस्टर होईल इतकी त्यामध्ये क्षमता आहे, असे सांगितले.आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या गतीने होऊ लागला आहे. दर्जेदार कापडाची निर्मिती होत आहे. टेक्निकल टेक्स्टाईलचे क्षेत्रही विकसित होत आहे. ही सर्व गती पाहता येत्या तीन वर्षांमध्ये इचलकरंजीतून 40 हजार कोटी रुपयांचे कापड निर्यात होईल हे ध्येय ठेवले असल्याचे सांगितले. राज्याच्या आढावा वस्त्र उद्योग धोरणात वस्त्र उद्योजकांना अपेक्षित असलेल्या गोष्टी पूर्ण होतील असेही त्यांनी आश्‍वस्त केले.
प्रारंभी पिडीक्सिलचे अध्यक्ष विश्‍वनाथ अग्रवाल यांनी प्रदर्शनाची माहिती दिली यावेळी पिडीक्सिलचे माजी अध्यक्ष, संचालक सुनील पाटील, संचालक गजानन होगाडे, डीकेटीईच्या मानसचिव सपना आवाडे, प्राचार्य अडमुठे यांच्यासह अविनाश पाटील आशिष भोजे उपस्थित होते आभार इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी माणले कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!