गारगोटी /ता.१ आनंद चव्हाण
गाय दूधाला प्रतिलीटर १०रूपये अनुदान , दूध भुकटीला निर्यात अनुदान , दुधाला रास्त भाव ,आणि दुध उत्पादकाला न्याय द्यावा . या मागण्यांसाठी आज भाजपच्या भुदरगड तालुक्याच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील यांचे नेतृत्वाखाली दुध एल्गार आंदोलन करण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज सगळ्या व्यवसायावर गंडांतर आले असताना , शेतकऱ्याच्या अर्थचक्राला गती देण्याचे काम दुध व्यवसायाने केले आहे. अशा परिस्थितीत मात्र गेल्या काही दिवसापासून शासनाने दूधाचे दर कमी केले , असल्याने थोड्याफार प्रमाणात सुरू असलेले शेतकऱ्यांचे अर्थचक्र मंदावले आहे.आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहीली तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच दुध व्यवसायाला अधिक गती देण्याची गरज असताना तीन चाकी महाआघाडी सरकारने दुधाचे दर कमी करुन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. या दुध दरकपातीचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सांगितले .यावेळी खानापूर,पिंपळगाव,हणबरवडी, कडगाव,कोनवडे,मिणचे आदी ठिकाणी भाजपा शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आली.
यावेळी नारायण कुपटे, दिनकर कुंभार, पांडुरंग पोवार, आनंदा पोवार, सदाशिव पोवार, शिवराज पाटील, बाळासाहेब कुंभार, बाजीराव कुंभार , सौ. संपदा हिरुगडे, सौ. विमल कुपटे, सौ.सुनिता पोवार, सौ.द्रोपदी पाटील, सौ. भारती पोवार, सौ.कमल पाटील,विनायक पोवार, उत्तम कुंभार, जयराम पोवार, विनायक ( पप्पू ) कुंभार,दत्तात्रय पाटील, सागर कुपटे, सूरेश कुंभार, कृष्णात कुंभार,शांताराम पाटील, अक्षय कुंभार,बंडेराव कुंभार, मारूती पोवार, हिंदूराव कुपटे, प्रविण पाटील, संदिप पोवार, अनिकेत कुंभार , सुरेश सुतार, लखन लोहार, अतुल लोहार,यांचेसह दुधउत्पादक , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हणबरवाडी येथे ग्रा.पं. गारगोटीचे सदस्य अलकेश कांदळकर यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढ मिळावी यासाठी आंदोलन छेडण्यात आले.यावेळी बाबुराव पिंगळे,एकनाथ पाटील,योगेश मुदाळकर,मिथिल कांदळकर आदींसह दूध उत्पादक उपस्थित होते.
खानापूर येथे भाजपचे युवा नेते मा.अमोल पाटील, सर्जेराव पाटील,विश्वासराव चव्हाण, आनंदराव पाटील, आनंदा रेडेकर,शंकर नाईक, दिलिप गुजर, हिमांशू नाईक,ए डी कांबळे, रमेश पाटील, भिकाजी पाटील, सागर चव्हाण,सुरेश पाटील, संतोष पाटील, अमोल नाईक, अनिल चौगले,पैलवान वैभव पाटील, पैलवान अरविंद पाटील, संकेत पाटील आदी उपस्थित होते.
कडगाव येथे भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पश्चिम भुदरगड च्या वतीने दूध दर वाढ मिळावी यासाठी सरकारविरोधी तीव्र निदर्शने करण्यात आली.यावेळी विनायक देसाई,जयराम कांबळे,दीपक डोंगरे,शशिकांत पाटील,रमेश चौगले,संदीप भुतुर्णे,रंगराव कांबळे,आबु देसाई,महादेव चव्हाण आदींसह पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते…