गारगोटी ता.२९ (प्रतिनिधी)
भुदरगड तालुक्यात कोरोनाचा कहर झाला,आज दुपार पर्यंत पंचायत समितीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध गावातील तब्बल नऊ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, यामध्ये कोविड उपचार केंद्रातील पाच जणांचा समावेश असलेने पंचायत समिती तसेच पूर्ण तालुका हादरून गेला.
एक भुदरगड तालुक्याच्या दृष्टीने आजचा दिवस कोरोनाचा कहर करून गेला, रुग्णावर उपचार करणाऱ्या पंचायत समितीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कोवोड उपचार केंद्राकडे काम करणाऱ्या पाच जणांसह तालुक्यातील विविध गावातील एकूण नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले, आणि तालुक्याचा कोरोना बाधितांचा आकडा ११२ वर पोहोचला.
परवा दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता,त्यांच्या संपर्कात आलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचेसह बारा अधिकारी व कर्मचारी यांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेऊन त्यांचे स्वाब घेतले होते,त्या बारा जणांपैकी पाच अहवाल आज पॉझिटिव्ह आले, तर भुदरगड तालुक्यातील पळशिवणे गावातील ३० वर्षीय युवक,वेंगरूळ गावातील ३८ वर्षीय पुरुष, पुष्पनगर गावातील ३२ वर्षीय महिला ,व बसरेवाडी गावातील ४६ वर्षीय पुरुष असे एकूण नऊ अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले, त्यामुळे भुदरगड तालुका हादरून गेला आहे .