भुदरगड तालुक्यात ३४ रुग्णांची भर ;तालुक्याची संख्या पोहोचली २३५ वर

गारगोटी /ता :५ (प्रतिनिधी)

         गारगोटी शहरात आज नव्याने नऊ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाले असून आज भुदरगड तालुक्यात आज ३४ नवीन रुग्णाची भर पडली, त्यामुळे तालुक्याच्या संख्येने आज २३५ आकडा गाठला, रुग्णांच्यासंख्येच्या वाढीचा वेग तालुक्यासाठी चिंताजनक आहे.
    आज दुपारपर्यंत भुदरगड तालुक्यातील रुग्णांचे अहवाल आले . त्यामध्ये गारगोटी येथे एकाच कुटूंबातील आई वडील व दोन मुली अशा चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . तर दुसऱ्या कुटूंबातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . तर गारगोटीतील इतर दोन युवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेने आज शहरातील नऊ रुग्ण कोरोना बाधित आढळले. शेणगाव येथे पती- पत्नी , मिणचे खुर्द येथील पती – पत्नी ,कोरोना बाधित आढळले . तर पुष्पनगर येथे एक ८० वर्षीय वृद्ध व ३८ वर्षीय पुरुष, पाल येथील दोन युवक,पांगीरे येथील एक युवक,टिक्केवाडी येथील दोन युवक,आदमापूर येथील दोन स्त्री-पुरुष,कोनवडे व मुदाळ येथील दोन महिला, लहान बारवे व हेदवडे येथील दोन पुरुष,आकुर्डे येथील एक युवक,मडूर येथे दोन पुरुष, पाटगाव येथे एक महिला व वेसर्डे येथील एका कुटुंबातील स्त्री पुरुष असे एकूण ३४ रुग्ण आज पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या २३५ वर पोहोचली आहे.

     काही गावात कोरोनाचा नव्याने प्रवेश भुदरगड तालुक्यातील काही गावात कोरोनाचा शिरकाव अद्याप पर्यन्त झाला नव्हता . त्यामुळे ही गावे निवांत होती . पण आज पांगीरे, कोनवडे, मिणचे खुर्द या गावात कोरोनाने शिरकाव केलेने या गावात चिंता वाढली आहे.

     रुग्ण वाढीचा वेग चिंताजनक भुदरगड तालुक्यात कोरोना रुग्णाची पहिली शंभरी गाठण्याचा कालावधी हा चार महिन्यांचा होता . पण पुढची शंभरी फक्त पाच दिवसात गाठली गेलेने तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे तालुक्यातील संख्येने २३५ आकडा गाठलेने तालुक्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.

error: Content is protected !!