शिरोली / ता. ६ :
मुंबईहुन आलेल्या भुयेवाडी (ता. करवीर) येथील तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भुयेवाडी गाव पाच दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. हा तरुण मुंबई येथे नेव्हीत होता.
ता. 3 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भुयेवाडी येथे घरी आला. ही माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला सीपीआरला पाठवून त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या घरातील चौघांनाही रात्री उशिरा सीपीआर हॉस्पिटल नेले असून त्यांचे स्वॅब घेतले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भुयेवाडी ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव लॉकडाऊन केले आहे. तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.