‘बिद्री’ वर पुन्हा केपीच, विरोधकांचा धुव्वा,२५ जागांवर विजय

संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या आणि अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Bidri Sugar Factory Election) काल (मंगळवार) पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आमदार सतेज पाटील,(satej patil) के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व २५ जागांवर दणदणीत विजय मिळवत पुन्हा सत्ता मिळवली.


विरोधी आमदार प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), खासदार संजय मंडलिक, ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा धुव्वा उडाला. सुमारे सात हजारांपेक्षा जास्त मताधिक्यांनी सत्ताधाऱ्यांनी (Mahalaxmi Shetkari Vikas Aghadi) हा गड जिंकला.
निकालानंतर मुस्कान लॉन येथील मतमोजणी केंद्रासह कारखाना कार्यक्षेत्रात विजयी समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष करीत मुश्रीफ, सतेज पाटील आणि के. पी. यांचा जयघोष केला. निवडणुकीत अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यासह आठ विद्यमान संचालक विजयी झाले, तर पाच विद्यमान संचालकांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तीन माजी संचालकांचे कारखान्यात पुनरागमन झाले.


बिद्री’त सत्ताधारी के. पी. पाटील यांच्या आघाडीविरोधात आमदार प्रकाश आबिटकर आणि ए. वाय. पाटील यांनी परिवर्तनचे तगडे आव्हान उभे केले होते. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतदान होईपर्यंत परिवर्तनने प्रचारात जोरदार हवा निर्माण केली; परंतु त्यांना हा उत्साह मतदानात रूपांतरित करता आला नाही. विरोधी आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही

error: Content is protected !!